रवी जाधव यांच्या न्यूड सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग झाला मोकळा…

मराठी सिनेमात नवनवे प्रयोग करणार दिग्दर्शक रवी जाधव यांचा न्यूड हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सिनेमाचे नाव आणि विषय हा चर्चेचा विषय ठरला होता.

महोत्सावात सिनेमावर बंदी

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही त्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर एस दुर्गा या महोत्सवातूनही हा सिनेमा वगळण्यात आला होता. इतकंच नाही तर सिनेमासाठी रवी जाधव कोर्टाची पायरीही चढले. या सगळ्यात मात्र मराठी सिनेसृष्टीने रवी जाधव यांना पाठिंबा दिला.

या दिवशी होणार प्रदर्शित

अनेक वादातून जात आता या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेरीस कोणत्याही कट्शिवाय २७ एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची कथा अगदी वेगळी असून यात राजश्री देशपांडेची प्रमुख भूमिका आहे.
प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *