प्रसिध्द वडाली ब्रदर्सची जोडी तुटली, प्यारेलाल वडाली यांचं निधन

सुप्रसिद्ध वडाली ब्रदर्स या गायक जोडीपैकी प्यारेलाल वडाली यांचे आज निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे अमृतसरमध्ये निधन झाले.

जगभरात आपल्या सूफी गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी वडाली ब्रदर्स यांची जोडी आता तुटली आहे. पद्मश्री पूर्वचंद वडाली यांचे लहान भाऊ प्यारेला वडाली यांचं आज निधन झालं. प्यारेलाल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. अशातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचं निधन झालं. प्यारेलाल यांना अमृतसर येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांनी ‘तू माने या ना माने दिलदारा’ सारखे अनेक लोकप्रिय गाणी संगीत विश्वाला दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *