विमानात कपडे काढून पॉर्न पाहणारा विद्यार्थी अटकेत

विमानात गैरवर्तन झाल्याच्या घटना समोर येत असताना आता एक विचित्र घटना समोर आली आहे.

विमानातील प्रवाशावर गंभीर आरोप

बांगलादेशमधील एका प्रवाशाने मलेशियाहून उड्डाण घेतलेल्या विमानात चक्क कपडे काढले. इतकचं नाहीतर या प्रवाशाने कर्मचाऱ्यावर हल्लाही केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एअरलाईन्सने सांगितले की, या घटनेनंतर आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

…अन् पाहू लागला पॉर्न

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मालिंडो एअरच्या विमानाने शनिवारी क्वालालांपूर येथुन उड्डाण घेतलं. या विमानात २० वर्षीय तरुणाने आपले कपडे काढळे आणि लॅपटॉपवर पॉर्न पाहण्यास सुरुवात केली.

विमानात एकच खळबळ

या तरुणाने विमानात कपडे काढल्याने एकच खळबळ उडाली. विमानातील केब्रिन क्रू च्या सांगण्यावरुन या तरुणाने कपडे पुन्हा घातले. मात्र, त्याचवेळीच त्याने महिला क्रू सदस्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करु लागला. यावेळी महिला क्रू सदस्यांनी नकार देताच तो आक्रमक झाला आणि एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला.

हल्ला केल्यानंतर केबिन क्रू सदस्यांनी आणि प्रवाशांनी मिळून या प्रवाशाला पकडून त्याचे हात बांधले.

या तरुणाने हे कृत्य का केलं? या मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. एअरलाईन्सने स्टेटमेंट प्रसिद्ध करत म्हटलयं की, ढाका येथे जाणाऱ्या विमानात अडथळा निर्माण करणाऱ्या प्रवाशाला बांधण्यात आलं असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *