शरीराचे दोन तुकडे होऊनही त्याने सांगितला नाव पत्ता आणि…

हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ नंदुरबार रेल्वे स्थानकात समोर आला आहे. रेल्वे कटींगमध्ये शरीराचे दोन तुकडे झाल्यावरही, धडाचा भाग हा पोलीसांशी बोलतो आहे, असा हा व्हिडीओ आहे.

नंदूरबार रेल्वे स्थानक परिसरात संजय नामदेव मराठे या युवकांने  मालगाडी खाली झोकून देऊन आत्महत्या केली असून हा आत्महत्या करणारा युवक शहरातील लहान माळी परिसरातील राहणारा होता.

रेल्वे खाली आल्याने या तरुणाचे शरीराचे दोन तुकडे झाले होते. त्या ठिकाणी लागलीच रेल्वे पोलीस दाखल झालेत, त्यांनी पाहणी करीत असताना संजयच्या शरीराचे दोन तुकडे झाल्यावर ही तो तरुण स्वतःच्या हातावर उठण्याचा प्रयत्न करीत पोलिसांशी बोलत असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

संजयने रेल्वेखाली येऊन आत्महत्या का केली? याचा उलगडा होऊ शकलेला नाही, तो शहरात रिक्षा चालक होता. त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाल्यावरही त्याची धडपड मन सुन्न करणारी होती. शरीराचे दोन तुकडे होऊनही जिवंत असलेला संजय तब्बल काही वेळापर्यत हालचाल करत होता. हे दृश्य मन हेलावणारे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *