मुंबईत दादरमध्ये रानडे रोडला फायरिंग

मुंबईत दादरमध्ये रानडे रोडला फायरिंग

दादरला रानडे रोडवर दोन अज्ञात इसमांनी फायरिंग केली आहे. रानडे रोडवरील कॉसमॉस बँकेजवळ सायंकाळी सव्वा सहा वाजता ही घटना घडली. या इसमांनी दोन राऊंड फायर केले असल्याचं सांगण्यात येत आहे.

बाईकवर हे दोन अज्ञात इसम आले होते, त्यांनी गोळीबार केला, या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचं सांगण्यात येतंय. मात्र फायरिंग करणाऱ्या अज्ञात इसमांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. ही फायरिंग करण्यामागे काय उद्देश होता, त्यांचा निशाणा चुकला का?, हे अजून समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *