घाटकोपरमध्ये दुकानांना अचानक आग, जिवीतहानी नाही

घाटकोपर पूर्वेला रात्री काही दुकानांना अचानक आग लागली त्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

शुक्रवारी रात्री साकिनाका इथे गोदाम कारखान्याला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच घाटकोपर मधील पंतनगर मधे शनिवारी रात्री साडे अकरा वाजता एका चहाच्या टापरीला आग लागली.

सुरुवातीला कमी असलेली हि आग नंतर वाढली ज्यामध्ये चहाच्या टपरीसोबतच त्या टपरी मागे असलेलं एक दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं.

या आगीमध्ये एक मोठा वटवृक्ष ही अर्धा जाळलाय. अग्निशामक दलाने 1 तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली.  सुदैवाने यात कोणतीही  जीवित हानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *