वृद्धाच्या मृत्यूनंतर विरारमध्ये डॉक्टरला नातेवाईकांकडून मारहाण

विरारमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली.

कुठे घडली घटना?

विरारच्या मोहक सिटी परिसरात आरूष हॉस्पिटलमध्ये काल रात्री अकराच्या सुमाराला ही घटना घडली. पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळे नातेवाईन मृतदेह घेऊन गेले. पण डॉक्टर जबर जखमी झालेत. नालासोपा-याच्या नगिनदास पाडा इथे राहणारे रामकिशन यादव यांना रक्तदाब कमी झाल्याच्या कारणावरून आरूष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांची चूक झाल्याचा आरोप

दोन दिवसांच्या उपचारानंतर रात्री अकराच्या सुमाराला त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार होतं. पण त्याचवेळी तिथल्या डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिलं. या इंजेक्शनमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. संतापलेल्या नातेवाईकांनी डॉ. सुनील त्रिपाठी यांना बेदम मारहाण केली. नातेवाईकांचे आरोप डॉक्टर आणि त्यांच्या असोसिएशने फेटाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *