जप्तीची कारवाई टाळण्यासाठी हा सगळा ‘ड्रामा’

जप्तीची कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पतपेढीच्या कर्मचाऱ्यांना आत्महत्येची धमकी देऊन वेठीस धरल्याची घटना मुंबईत घडलीय.

विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात दीपक कुबलकर यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटवर जप्ती आणण्यासाठी पोलिसांसह पतपेढीचे कर्मचारी पोहोचले.

मात्र, दीपक यांनी दरवाजा उघडला नाहीच, शिवाय घरगुती गॅसच्या टाकीवर बसून स्फोट घडवण्याची धमकी ते देत होते. गेल्या अनेक तासांपासून हा ड्रामा सुरू होता… शेवटी कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना कारवाईविनाच तिथून काढता पाय घ्यावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *