सासरच्या जाचाला कंटाळून चिमुरड्यासह महिलेची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून एका महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याची घटना समोर येतेय.

माहेरुन घर खर्चासाठी एक लाख रुपये आणावे, या मागणीसाठी सासरकडील मंडळींनी २९ वर्षीय विवाहितेचा मानसिक आणि शारिरीक छळ सुरु केला होता.

योगिनी दिपक खतोडे असं या महिलेचं नाव असून आपल्या तीन वर्षाचा मुलगा अभिराजसह तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलगा हरविल्याची तक्रार पती दिपक खतोडे यांनी दाखल केली होती. त्यानंतर योगिनीची शोधाशोध तिच्या माहेरच्यांनी सुरु केला.

दरम्यान, मंगळवारी कौठे धांदरफळ इथे लांडगे यांच्या विहिरीमध्ये एका महिलेचा आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. ओळख पटल्यानंतर योगिनीच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि सासरची मंडळी तिच्याकडून माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करत असल्याचं सांगितलं. तक्रारीनंतर पोलिसांनी योगिनीच्या पतीला अटक केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *