रणबीर कपूर स्कुटीवरून मुंबईत फिरला, आम्ही नाही पाहिला

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याने नुकतीच मुंबईतील रस्त्यांवर स्कुटीवरून मनसोक्त भटकंती केली. विशेष म्हणजे यावेळी त्याला कोणी ओळखले नाही. या गोष्टीवर विश्वास ठेवणे अशक्य आहे. मात्र, हे प्रत्यक्षात घडले आहे.

अभिनेता हुसेन दलालने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून रणबीर कपूरचे हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मास्कने चेहरा झाकलेला रणबीर कपूर आणि हुसेन दलालचा सेल्फी दिसत आहे. रणबीर कपूर सध्या दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’चे चित्रीकरण करत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट आणि अमिताभ बच्चन यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

या चित्रपटात भेंडी बाजारातील काही दृश्ये चित्रीत करण्यात येणार आहेत. यासाठी रणबीरला भेंडी बाजाराचा परिसर प्रत्यक्षात पाहायचा होता. मात्र, याठिकाणी थेटपणे गेल्यास रणबीरला चाहत्यांचा गराडा पडण्याची शक्यता होती. त्यामुळे रणबीरने चेहऱ्यावर मास्क घालून भेंडीबाजारात जायचे ठरवले. रणबीरची ही शक्कल यशस्वी ठरली. त्यामुळे रणबीर आणि हुसेनला स्कुटीवरून भेंडीबाजारात मनसोक्त फिरता आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *