काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन

काँग्रेसचे श्रीरामपूर येथील माजी आमदार आणि शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष जंयत ससाणे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर संध्याकाळी ४ वाजता श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री, मुलगा करण आहे.

ससाणे दोन वेळा श्रीरामपूरचे आमदार होते. त्यांनी १० वर्षे नगराध्यक्षपदही भूषविले होते. मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरही त्यांनी काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते फुफ्फुसाच्या कर्करोगाने आजारी होते. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयंत ससाणे यांच्या निधनामुळे एक सक्रिय, सजग आणि संवेदनशील लोकसेवक हरपला आहे. ते माझे मित्र आणि निकटचे सहकारी होते. त्यांच्या निधनाने आम्ही कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *