नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झालेले आहेत.
अपघातात ठार झालेले सर्व तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. नागपूरकडे येताना वडधामना शहंशाह हॉटेलजवळ या विद्यार्थ्यांच्या कारची धडक झाली आणि सर्व जण जागीच ठार झाले.
मृतांमधील एक तरुणी नागपुरातील एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे.
