सलमान खानला मोठा झटका, NGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट

बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

सलमान खानची सामाजिक संस्था (एनजीओ) बीईंग ह्युमन अनेक सामाजिक कामांत सहकार्य करते. मात्र, हीच सामाजिक संस्था आता अडचणतीत येण्याची शक्यता आहे.

घोषणा केली मात्र…

झालं असं की, सामाजिक संस्था बीईंग ह्युमनने २०१६ साली बीएमसीसोबत मिळून डायलिसिस सेंटर उभारण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र, या संस्थेकडून अद्याप डायलिसिस केंद्र उभारण्यास सुरुवात झालेली नाहीये. त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेने याविरोधात कारवाई केली आहे.

बीईंग ह्युमन काळ्या यादीत 

डायलिसिस सेंटरच्या कामास जवळपास दोन वर्षांनंतरही सुरुवात न झाल्याने बीएमसीने या संस्थेला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकलं आहे. बीएमसीचे अतिरिक्त मनपा आयुक्त ईडेज कुंदन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *