रेल्वेत जेवण बनवताना बटाटे, असे पायाखाली चिरडतात…

तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा गाडीत तयार झालेले खाद्यपदार्थ खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्थानकावर पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे बटाटे पायाखाली चिरडले जात असल्याची व्हिडिओ क्लिप समोर आली आहे.

अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे येथील ही दृष्य

अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे येथील ही दृष्य आहेत. बटाटावडा, कटलेट, पॅटीस तयार करण्यासाठी शिजवलेला बटाटा हा असा पायाखाली तुडवला जातोय.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडेही तक्रार

इतकंच नव्हे, तर या दोघांनी याबाबत ट्वीट करत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडेही तक्रार केली आहे. रेल्वे प्रशासनानं याची तातडीनं दखल घेऊन प्रवाशांना खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आश्वस्त करणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *