एक रुपयात करा विमान प्रवास

 एक रुपयात करा विमान प्रवास

स्वस्त हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणा-या स्पाईस जेटने अवघ्या एक रुपयांत करा विमान प्रवास ही नवी ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये कर आणि शुल्काचा समावेश कऱण्यात आलेला नाही.

एक रुपयांत देशांतर्गत प्रवासासाठीची एक लाख तिकीटे स्पाईस जेटने उपलब्ध केली आहे. ही ऑफर आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली असून १७ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे.

एक रुपया हे तिकीट केवळ एकतर्फी प्रवासासाठी असणार आहे. परतीच्या प्रवासासाठी मात्र प्रवाशांना नियमित दराने तिकीट घ्यावे लागेल. तुम्ही या तिकीटावर १५ जुलै ते ३१ मार्चपर्यंत तुम्ही प्रवास करु शकता.

स्पाईस जेटच्या नव्या अॅपद्वारे तुम्हाला हे तिकीट बुक करावे लागेल. हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी गुगल प्ले स्टोरमधून तुम्हाला हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर या अॅपद्वारे तुम्ही तिकीट बुक करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *