दुबईत जगातील सर्वात उंच हॉटेलचे उद्घाटन

दुबईमध्ये जगातल्या सर्वात उंच हॉटेलचं उद्घाटन पार पडले. ३५६ मीटर उंच असलेलं हे हॉटेल ग्राहकांसाठी सुरु करण्यात आलेय.

७५ मजली हॉटेल 

‘गेवोरा’असं या हॉटेलचं नाव असून जवळपास ७५ मजली हे हॉटेल आहे. सुरक्षेसाठी या हॉटेलमध्ये ५२८ कॅमेरे लावण्यात आले आहेत.

या हॉटेलात काय काय आहे?

या हॉटेलसह चार रेस्टॉरंट, ओपन एयर पूल डेक, लग्जरी स्पा, हेल्थ क्लबही यात आहेत. या हॉटेलमध्ये  ५२८ खोल्याआहेत. याआधी जगात ३३३ मीटरचे उंच हॉटेल होते.

नेमके कोठे आहे हॉटेल?

या हॉटेलचे बांधकाम २००८ मध्ये सुरु करण्यात  आले होते. शेख जायेद रोडवर असून मजिद अल आत्तार यांनी बांधले आहे. याआधी दुबईत जेडब्ल्यू मॅरियट मॅक्विस हे सर्वात उंच हॉटेल होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *