सिनेमासाठी २५ कोटी खर्च, आला फक्त एकच प्रेक्षक

प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास मस्तानने बॉलीवूडला खूप यशस्वी सिनेमा दिले. संस्पेन्स आणि थ्रिलर साठी त्यांचे सिनेमा ओळखले जातात. पण त्यांनी बनविलेला एक सिनेमा पाहण्यासाठी केवळ एक प्रेक्षकच आला होता.

आपल्या करियरमध्ये अब्बास यांनी शाहरूख खान पासून ते अक्षय कुमार आणि कपिल शर्मा सारख्या अभिनेत्यांचे करियर बनविले. कपिलने अब्बास मस्तान यांच्या कॉमेडी सिनेमातूनच एन्ट्री केली.

सुपर डुपर फ्लॉप 

खूप वर्षांनंतर अब्बास रोमॅंटिक आणि थ्रिलर सिनेमा घेऊन आले. या सिनेमातून ते आपल्या मुलाचा डेब्यु करत आहेत. अब्बासचा मुलगा मुस्तफा ‘मशीन’ या सिनेमातून डेब्यु करतोय. ‘धोनी’ सिनेमात साक्षीची भुमिका करणारी कियारा आडवाणी यामध्ये लीडमध्ये दिसणार आहे.

बॉलीवूडच्या स्ट्रगलिंग अभिनेत्यांचे करियर घडविणाऱ्या अब्बास यांनी आपल्या मुलाचा सिनेमा सर्वात फ्लॉप होईल असा विचारही केला नव्हता.

२५ कोटींचा खर्च 

समीक्षकांनी या सिनेमाला झीरो स्टार दिले. अब्बास-मस्तान या जोडीच्या कारकिर्दीतील हा सर्वात वाईट सिनेमा होता.

यामध्ये ९० व्या शतकातील गाणं ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ ला नव्या ढंगात आणलंय.  या सिनेमासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च आला.

एकच प्रेक्षक 

मुंबईतील जुहूच्या पीव्हीआरमध्ये एक प्रेक्षक हा सिनेमा पाहायला गेला. एवढ्या मोठ्या बॅनरचा सिनेमा आणि  एकच प्रेक्षक असे बॉलीवूडच्या इतिहासातही पहिल्यांदाच झालेयं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *