फेसबुक मैत्रीनंतर नोकरीच्या आमिषाने डॉक्टर महिलेवर बलात्कार

दंतचिकित्सक महिला डॉक्टरला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात व खासगी हॉटेलमध्ये वेळोवेळी बलात्कार करून तिला धमकी दिल्याच्या महिलेच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी एका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांवर बलात्काराचा गुन्हा रविवारी दाखल केला.

पीडित महिला ही संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील रहिवासी आहे. तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी विजय अण्णासाहेब मकासरे (मूळ रा. वळण, ता. राहुरी, हल्ली इंदिरानगर, श्रीरामपूर) याची व माझी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपी मकासरे याने नोकरीचे आमिष दाखवून सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात व शिर्डीतील हॉटेल प्रतीक व नगरपंचायतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका हॉटेलवर अशा वेगवेगळय़ा ठिकाणी नेऊन वेळोवेळी बलात्कार करून मारहाण करून धमकी दिली.  या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी विजय अण्णासाहेब मकासरे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *