तुकाराम मुंढे फक्त एकाच माणसाला घाबरतात

पुण्याहून बदली होवून नाशिकचे महापालिका आयुक्त म्हणून आलेले तुकाराम मुंढे यांचा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी धसका घेतला आहे, तर दुसरीकडे नाशिक शहरातील तरूणाई तुकाराम मुंढेंची फॅन झाली आहे.

सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंचं स्वागत

सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांच्या नावाने अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. कदाचित यामुळे महापालिकेच्या कारभारात सुधारणा होईल, अशी अपेक्षा तरूणांना असावी.

तुकाराम मुंढे यांना यापूर्वी अनेक धमक्या

दुसरीकडे कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे अनेकांना नकोसे झाले आहेत, नवी मुंबई नंतर पुण्यातही त्यांना धमकीचं पत्र आली होती. मात्र तुकाराम मुंढे हे कधीही डगमगताना दिसले नाहीत.

मुंढे म्हणतात, मी जगात फक्त एकाच माणसाला घाबरतो

तुकाराम मुंढे फक्त घाबरतात ते आपल्या वडील बंधूंना, तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात हे बोलून दाखवलं होतं, मी जगात माझ्या बंधूला सोडून कुणालाच घाबरत नाही, तुकाराम मुंढे यांच्या मनात आपल्या भावाबद्दल आदरयुक्त भीती आहे, असं त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *