शिक्षिकेने कानाखाली मारल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

जिल्ह्यातील रसडा कोतवाली क्षेत्रातील घटना.

या ठिकाणी कॉन्वेंट विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कानाखाली मारल्यामुळे 7 फेब्रुवारी रोजी सकाळी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकारी अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार रसडा कोतवाली क्षेत्रातील ही घटना.

5 फेब्रुवारी रोजी कॉन्वेंट शाळेत शिकवणाऱ्या रजनी उपाध्याय नावाच्या शिक्षिकेने 11 वर्षाच्या सुप्रिया वर्मा या विद्यार्थिनीच्या कानाखाली मारली. यामुळे ती बेशुद्ध पडली. तिच्या कुटुंबातील लोकांनी तिला तात्काळ रूग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगत तिला बनारसमध्ये घेऊन जाण्याचं सुचवलं. उपचारा दरम्यान 7 फेब्रुवारीला रूग्णालयात मृत्यू झाला.

शाळेच्या प्रांगणात ठेवला मृतदेह 

कुटुंबियांनी सुप्रिया या विद्यार्थिनीचा मृतदेह शाळेच्या प्रांगणात ठेवले. सूचना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी पोहोचले. आता तिचा शव आता पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आली असून मुलीच्या वडिलांनी संतोष वर्मा यांनी शिक्षिका रजनी उपाध्याय यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *