अहमदनगरमधील तरूणाने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतलं, परीक्षा देऊनही नोकरी न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगरमधील एका तरूणाने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अविनाश शेटे या 25 वर्षीय तरुणाने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

अविनाश शेटे या तरूणाने सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र, सरकारने निर्णय न दिल्याने वारंवार मंत्रालयात फेऱ्या मारावा लागत होत्या. मंत्रालयाच्या रोजच्या चकरा मारून दमलेल्या या तरूणाने आज मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर अंगवार रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणाला कुठल्याही प्रकारची इजा झाली नसून त्याची चौकशी केली जातीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *