विलेपार्ले येथे व्हिडीओ क्लिप्सचा धाक दाखवून १५ वर्षीय मुलीवर नऊ जणांनी बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. याविषयी तक्रार दाखल झाल्यानंतर विलेपार्ले पोलिसांनी नऊ जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून तिघे फरार आहेत. अटकेतील एक आरोपी हा एका स्थानिक राजकीय नेत्याचा मुलगा आहे.
श्रेयस डिके, अक्षय बोरकर, प्रवीण पांगळे, सौरभ राणे, रिद्धेश धुरी, मयूर चव्हाण अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
प्रचंड तणावाखाली आलेल्या या मुलीची प्रकृती बिघडत गेली. त्याचे कारण आईने विचारले असता तिने सगळा प्रकार कथन केला. यानंतर विलेपार्ले पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी कारवाई करीत सहा आरोपींना अटक केली. तीन आरोपी अद्याप फरार आहेत. सहा आरोपींना न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
