तरूणाकडून ६० वर्षीय शिक्षिकेची घरात हत्या

डोंबिवली कोपर गाव परिसरात राहत असलेल्या मनीषा खानोलकर या 60 वर्षीय शिक्षिकेची राहत्या घरात हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय. या घटनेमुळे एकच खळबळ उडली होती. या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय.

डोक्यावर कुकरने मारहाण

विष्णू नगर पोलिसांनी रोहित तावडे या तरुणाला अटक केली आहे. आईला शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या रोहितनं खानोलकर यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात कुकरने मारत या शिक्षिकेची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. त्यांचा दरवाजा बंद असल्यानं विष्णुनगर पोलिसांनी दरवाजा तोडला असता मनीषा घरातील स्वयंपाकघरात मृत अवस्थेत आढळून आल्या.

रोहितच्या आईसोबत शिक्षिकेचं भांडण

डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. रोहितच्या आईसोबत मनीषा यांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याचा राग आल्यानं रोहितनं मनीषा यांची हत्या केल्याची कबुली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *