पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘सीडीएस’ परीक्षेत देशात पहिली

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची कन्या असून तिने पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून तोंडी आणि लेखी परीक्षेचा यात समावेश असतो. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे श्रुतीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. एप्रिल २०१८ पासून तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिली आला आहे. तिचे शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमधून ाझाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *