बंगळुरूत एका ‘मजुरा’नं आपला आयकर परतावा फाईल केला तेव्हा धक्कादायक सत्य बाहेर आलं… यामुळे आयकर विभागासोबतच पोलिसांनाही धक्का बसलाय.
हे ध्यानात आल्यानंतर आयकर विभागान आणि पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू केली. आयकर अधिकाऱ्यांनी रचप्पाला चौकशीसाठी बोलावलं. पोलिसांचीही त्याच्यावर नजर होतीच. चौकशीत त्यांच्यासमोर धक्कादायक माहिती उघड झाली.
चौकशीत धक्कादायक खुलासा
पोलिसांच्या चौकशीत समजलं की रचप्पा हा एक ड्रग डीलर आहे. ‘टाईम्स’नं दिलेल्या माहितीनुसार, रचप्पा २०१३ पर्यंत मजुरीचं काम करत होता. त्यानंतर त्याचा ड्रग्जचा धंदा करणाऱ्या लोकांशी संपर्क आला आणि त्यानंही हे अवैध काम सुरू केलं.
रचप्पानं या धंद्यात करोडोंची कमाई केली. त्यानं अनेकांना या धंद्याकडे आकर्षित केलं. यामध्ये त्याला इतका फायदा झाला की कनकपुरा रोड भागातील एक महागडा विला त्यानं भाड्यानं घेतला.
गेल्या काही वर्षांत त्यानं आपल्या गावात संपत्तीही खरेदी केलीय. वकिलांच्या सल्ल्यानं त्यानं स्वत:ला क्लास-१ चा ठेकेदार म्हणून रजिस्टरही केलं.
