दुचाकीच्या धडकेत ३० वर्षांच्या महिलेचा मृत्यू

पिंपरीत आज ३० वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगल तुपे असे अपघातात मृत्यू आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणी वाकड पोलीस पुढचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेवाडी या ठिकाणी रस्ता ओलांडताना मंगल तुपे यांना दुचाकी क्रमांक जी. जे. ०१ एल. के. ५२०७ ने जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यामुळे मंगल तुपे यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. मंगल तुपे कामावरून घरी चालल्या होत्या. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. मंगल तुपे धुणी-भांडी करण्याचे काम करत होती. मंगल तुपे त्यांच्या पतीसह थेरगाव संभाजी नगर भागात वास्तव्य करत होत्या. त्यांचा पती खासगी कंपनीत कामाला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळवे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *