सेल्फी काढताना भावाचा मृत्यू; बहीण रुग्णालयात

बंधा-यावर सेल्फी काढण्याच्या नादात एका १४ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्याला वाचविण्यासाठी बहिणीने प्रयत्न केले. परंतु तीला यश आले नाही. तिची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील आगर नांदुर येथे घडली.
आमेर करीम सय्यद (१४ रा.संजय नगर, गेवराई) असे मयत मुलाचे नाव आहे. तर हिना (१८) असे बहिणीचे नाव आहे. सय्यद दाम्पत्य गुरूवारी सकाळी आगर नांदुर येथील गोदावरीच्या पात्राजवळ असलेल्या पिराच्या कार्यक्रमासाठी गेले होते. करीम सय्यद व परवीन सय्यद हे दोघे कार्यक्रमात व्यस्त होते. एवढ्यात हिना व आमेर हे दोघांना बंधाºयावर जावून सेल्फीचा काढण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी काढत असतानाच आमेरचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. तो पाण्यात गटंगळ्या खात असतानाच हिनाने तत्काळ पाण्यात उडी मारली. परंतु तीला पुरेसे पोहता येत नसल्याने ती पण गटंगळ्या खात होती. यामध्ये आमेरचा मृत्यू झाला तर हिनाला लोकांनी धाव घेत पाण्याबाहेर काढले. परंतु हिनाच्याही नाका तोंडात पाणी गेल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *