पिता-पुत्रानेच दलित तरुणीला जाळून मारले

एका दलित तरुणीला (वय १९) जिवंत जाळल्याची घटना सोमवारी येथे घडली. लालगंज परिसरात घडलेले हे निर्घृण कृत्य एका पिता-पुत्राने केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

मिठार्इलाल यांची मुलगी अंजु सोमवारी घरी एकटी असताना दीप नावाचा तरुण व त्याचे वडील त्यांच्या घरात घुसले. त्यांनी अंजुवर केरोसीन टाकून तिला पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या अंजुला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *