बिग बॉस | अंतिम फेरीत शिल्पा शिंदे विजेता

: बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे ही विजेता ठरली, तर विजयाची प्रबळ दावेदार असणाऱ्या हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हिनाची शोमधील लोकप्रियता गेल्या काही दिवसांमध्ये वाढली होती. मात्र, अंतिम फेरीत शिल्पा माँ उर्फ शिल्पा शिंदे हिने अखेर बाजी मारली.

परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन

बिग बॉसचा यंदाचा अंतिम सोहळा चांगलाच रंगला. यावेळी पुनीश आणि बंदगीचा पूल डान्स, अर्शी खान आणि हितेन तेजवानी या जोडगोळीचा रेट्रो स्टाईल परफॉर्मन्स, हिना खान-लव्ह त्यागी आणि प्रियांक शर्मा या त्रिकुटाच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.

शक्यता अखेर खरी

अंतिम फेरीत विकास गुप्ता, शिल्पा शिंदे, हिना खान आणि पुनीश शर्मा हे चार स्पर्धक दाखल झाले होते. संपूर्ण पर्वात शिल्पा शिंदेच प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या पर्वाची विजेतीही तीच होईल असे अनेकांचे म्हणणे होते. ही शक्यता अखेर खरी ठरली.

काही दिवसांपासून अनेक तर्क

बिग बॉसच्या ११ व्या पर्वाचा विजेता कोण असणार या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्क लढवले जात होते. या रिअॅलिटी शोची सुरूवात १९ स्पर्धकांनी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *