लोकलच्या धडकेत घोड्याचा मृत्यू, म.रे. विस्कळीत

वांगणी-बदलापूर स्थानका दरम्यान लोकलची धडक लागल्याने एका घोड्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची अप मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली असून गाड्या अर्धा तास उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळीच हा अपघात झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वांगणी-बदलापूर स्थानका दरम्यान सकाळी एक घोडा अचानक रेल्वे रुळावर आला, त्याचवेळी समोरून आलेल्या लोकलने या घोड्याला उडविले. त्यामुळे घोड्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे अप मार्गावरील रेल्वे अर्धा तास उशिराने धावत आहेत. सकाळी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने चाकरमान्यांची लटकंती झाली. वाहतूक खोळंबल्याने अप मार्गावरील गाड्यांना प्रचंड गर्दी होती. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *