हिमाचल प्रदेशातील गीता वर्मांची आंतरराष्ट्रीय भरारी

गीता यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही त्यांचे अभिनंदन केले. हिमाचल प्रदेश राज्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, असे म्हणत त्यांनी गीता यांचे कौतुक केले. हिमाचल प्रदेशमधील करसोग तालुक्यात असणाऱ्या सपनोत गावातील गीता यांचा मुख्यमंत्र्यांतर्फेही सत्कार करण्यात आला. सध्या सोशल मीडियावर गीता यांचा दुचाकीवर स्वार असतानाचा फोटो बराच चर्चेत आला असून, त्यांच्या कामाचे अनेकांनीच कौतुक केले आहे. दुर्गम भागात दुचाकीवरुन लसी पोहोचवण्याच्या या अभियानाअंतर्गत गीता यांनी मेंढपाळ आणि गुर्जर समाजातील मजुरांच्या मुलांचे लसीकरण केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *