गोव्यात एका प्रवासी बसला आग

उत्तर गोव्यातील थिवी-माडेल येथे एका प्रवासी बसला शार्टसर्किटमुळे आग लागली.

प्रवासी सुखरूप

सर्व प्रवासी वेळीच सुखरूप बाहेर पडल्याने अनर्थ टळला. ही बस म्हापसा येथून थिवी येथे जात असताना वाटेत ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगिवर नियंत्रण मिळवलं.

मोठी दुर्घटना टळली

बस मध्ये 10 ते 15 प्रवासी होते. बसला आग लागली असल्याचे समजताच सगळे प्रवासी बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. बस जवळ उभी असलेली बाइक देखील यात जळून खाक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *