मल्लिका आणि तिचा बॉयफ्रेंड झाले बेघर….

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि तिचा बॉयफ्रेंड सायरिल ऑक्सनफॅंस यांना राहते घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे दोघे सध्या पॅरिसच्या पॉश परिसरात राहतात. फ्रांसीसी न्यायलयाने एक फर्मान काढून या दोघांना घर खाली करण्यास सांगितले आहे. या दोघांनीही राहत्या घराचे भाडे न दिल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. ४ डिसेंबरला न्यायालयाने मिल्लिका आणि तिचा बॉयफ्रेंड सायरिल ऑक्सनफॅंसला ७८,७८७ युरो भाडे न भरल्याने त्यांच्या घरातील फर्नीचर जब्त केले होते.

खूप काळापासून भाडे थकवले

मीडिया रिपोर्टनुसार, घर मालकाने सांगितले की, मल्लिका शेरावत आणि तिचा बॉयफ्रेंड सायरिल ऑक्सनफॅंसने १ जानेवारी २०१७ ला हे घर भाड्याने घेतले होते. याचे भाडे प्रती महिना २,७१५ युरो होते. मात्र खूप काळापासून भाडे थकल्याने त्यांना न्यायालयाची मदत घ्यावी लागली. १४ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत मल्लिका आणि तिच्या बॉयफ्रेंडने आर्थिक अडचणी असल्याचे सांगितले होते.

मल्लिका इन बॉलिवूड

मल्लिका शेरावतने बॉलिवूडमधील वेलकम, मर्डर आणि शादी के साईटइफेक्टस यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. मल्लिका शेरावत अखेर टाईम रियार्डस या चित्रपटात दिसली होती. याव्यतिरिक्त ती टी.व्ही. वरील इंटरटेनमेंट की रात या कार्यक्रमात देखील झळकली होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिच्या बेघऱ होण्याची बातमी सर्वत्र पसरताच तिने पॅरिसमध्ये आपला कोणताही फॅल्ट नसल्याचे ट्वीट करून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *