सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

पंजाबमधील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई यानं बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बिष्णोई यानं ही धमकी का दिली, याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.

बिष्णोई याच्यावर हत्येचा प्रयत्न, खंडणी व बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे अशा प्रकारचे २०हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एका उद्योगपतीच्या हत्येचाही आरोप असून याच प्रकरणात त्याला शुक्रवारी जोधपूर जिल्हा न्यायालयापुढं हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यानं सलमानला मारण्याची धमकी दिली. सलमानला मी जोधपूरमध्येच संपवणार, असं तो म्हणाला. या धमकीचा संबंध काळवीट शिकार प्रकरणाशी जोडला जात आहे.

जोधपूर पोलिसांनी बिष्णोईच्या धमकीची गंभीर दखल घेतली आहे. सलमान खानला आवश्यक तेव्हा पुरेशी सुरक्षा पुरविली जाईल, असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *