पाकिस्तानात दोन हिंदू व्यापाऱ्यांची गोळी झाडून हत्या…

पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात दोन हिंदू व्यापाऱ्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

काया आहे हे प्रकरण?

लुटमारीच्या उद्देशाने बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ही हत्या केली. दिलीप कुमार आणि चंदर माहेश्वरी अशी या मृत व्यक्तींची नावे असून ते धान्याचे व्यापारी होते.

या जिल्ह्यातील मीठी भागात त्यांचे दुकान आहे. ते उघडण्यासाठी जात असताना ही घटना घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकवरून आलेल्या गुंडानी या दोन्ही भावांकडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. विरोध होताच गुंडांनी गोळी झाडून त्यांची हत्या केली.

असा नोंदवला निषेध 

या घटनेनंतर हिंदूच्या प्रदेशातील लोकांनी आपली दुकाने बंद ठेवली आणि रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *