नवरा आहे ‘गे’; संतापलेल्या महिलेची पोलिसात तक्रार

आपल्या पतीवर संतापलेल्या एका महिलेने चक्क पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेची तक्रार ही नवरा बायकोतील नेहमीसारख्या भांडणाबद्दल नाही. तर, तिचा पती गे असल्यामुळे तिने ही तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.

घटना हैदराबाद येथील सैदाबाद पोलीस स्थानक परिसरातील आहे. तसेच, तक्रारदार महिला ही असिस्टंट प्रोफेसर आहे. महिलेचा आरोप आहे की, तिचा पती तिच्यापासून नेहमी दूर-दूर राहतो. आपल्याला संशय आहे की, पतीचे दूसऱ्या व्यक्तिसोबत प्रेमसंबंध असावेत.

महिलेने सैदाबाद पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘माझे लग्न सुमारे तीन वर्षांपूर्वीअंकूश सोबत झाली होती. सुरूवातीच्या काळात सर्व काही ठीक होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी आंकुषच्या वर्तनात प्रचंड बदल झाला. तो माझ्यापासून नेहमीच दूर राहात असे. सुरूवातीला मला वाटले की, त्याचे दुसऱ्या कोणत्या महिलेसोबत अनैतिक संबंध असावेत. पण, मी चुकीची ठरले.’

तक्रारदार महिला आपल्या तक्रारीत पुढे म्हणते, ‘मी खरोखरच चुकीची ठरले. माझ्या पतीचे कोणा महिलेसोबत अनैतिक संबंध नव्हते तर, तो रात्री उशीरपर्यंत आपल्या गे पार्टनरसोबत बोलत असे. नंतर मी बारकाईने निरिक्षण केले की, तो पुरूषांकडे पटकण आकर्षित होतो. मला त्याचा एक व्हिडिओही मिळाला आहे. ज्यामुळे त्याच्यावरचा माझा संशय अधिक बळकट झाला आहे. मी जेव्हा अंकूशला याबाबत विचारते तेव्हा तो मला मारहाण करतो’, असेही तक्रारदार महिलेने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *