ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्याने काही महिन्यांपूर्वी उत्तरप्रदेशमधल्या १०० हून अधिक बालकांना आपला जीव गमवावा लागला होता, या घटनेनंतर येथील रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला होता. या घटना ताज्या असताना नवाबगंज येथील सरकारी आरोग्य केंद्रातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्याने बॅटरीच्या प्रकाशात ३२ रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मुख्य वैद्यकिय अधिकारी राजेंद्र प्रसाद यांनी शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
या भागात अनेकदा वीज पुरवठा खंडीत होतो. या परिसरात १२- १२ तास वीज नसते. ज्या दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आल्या दिवशी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाला होता, मंगळवारी सकाळी वीजपुरवठा पूर्ववत झाला. पण, वीज आणि शस्त्रक्रियेसाठी अद्यावत सोयी नसताना देखील या सगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत राजेंद्र यांनी शस्त्रक्रियेची परवानगी दिली असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर रुग्णालयातील दोन बॅटरीच्या उजेडात ३२ रुग्णांवर सोमवारी शस्त्रक्रिया पार पडल्या.
धक्कादायक म्हणजे शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्णांना बेडची संख्या कमी असल्यानं जमिनीवरच झोपवले होते. सरकारी रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आल्यानंतर याप्रकरणी नवाबगंजच्या आरोग्य केंद्राच्या प्रमुखाचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच आरोग्य मंत्रालयानेही या प्रकरणी अहवाल मागवला आहे.ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्याने काही महिन्यांपूर्वी उत्तरप्रदेशमधल्या १०० हून अधिक बालकांना आपला जीव गमवावा लागला होता, या घटनेनंतर येथील रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला होता. या घटना ताज्या असताना नवाबगंज येथील सरकारी आरोग्य केंद्रातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्याने बॅटरीच्या प्रकाशात ३२ रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मुख्य वैद्यकिय अधिकारी राजेंद्र प्रसाद यांनी शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
या भागात अनेकदा वीज पुरवठा खंडीत होतो. या परिसरात १२- १२ तास वीज नसते. ज्या दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आल्या दिवशी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाला होता, मंगळवारी सकाळी वीजपुरवठा पूर्ववत झाला. पण, वीज आणि शस्त्रक्रियेसाठी अद्यावत सोयी नसताना देखील या सगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत राजेंद्र यांनी शस्त्रक्रियेची परवानगी दिली असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर रुग्णालयातील दोन बॅटरीच्या उजेडात ३२ रुग्णांवर सोमवारी शस्त्रक्रिया पार पडल्या.
धक्कादायक म्हणजे शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्णांना बेडची संख्या कमी असल्यानं जमिनीवरच झोपवले होते. सरकारी रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आल्यानंतर याप्रकरणी नवाबगंजच्या आरोग्य केंद्राच्या प्रमुखाचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच आरोग्य मंत्रालयानेही या प्रकरणी अहवाल मागवला आहे.