शेततळ्यात पडून तरूणाचा मृत्यू

पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथे घडली. श्रीकांत अप्पासाहेब सुतार (वय २३) असे मृत तरूणाचे नाव आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

अधिक माहिती अशी, श्रीकांत सुतार (रा. सलगर) हा रायगोंडा पंडित बिराजदार यांच्या शेतातील शेततळ्यातील पाणी आणण्यासाठी गेला होता. पाणी घेताना त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. इरण्णा सुतार यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *