कुलभूषण जाधवांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी, आई पाकिस्तानात

हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई 25 डिसेंबरला पाकिस्तानात जाणार आहेत.

पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती देण्यात आलीय. 25 डिसेंबरला व्यावसायिक विमानाने कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई पाकिस्तानात पोहोचतील आणि त्याच दिवशी ते परततील.

यावेळी पाकिस्तानातील भारतीय उप-उच्चायुक्त जे.पी सिंगदेखील त्यांच्यासोबत असतील. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *