बस नदीमध्ये पडल्याने १२ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

राजस्थानमधील माधोपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक प्रवाशांची बस नदीमध्ये पडल्याने अनेक प्रवशांचा मृत्यू झाला आहे.

प्रवाशी बस नदीमध्ये पडल्याने १२ प्रवाशांच्या मृत्यू झाल्याची माहिती येत आहे. २४ प्रवाशी जखमी असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली असून बचाव कार्य सुरु केलं आहे. दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.

ही दुर्घटना कशी घडली याबाबत अजूनही कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *