रुममेट्सच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

सहकारी मित्रांच्या मानसिक आणि त्रासाला कंटाळून बीएससी कृषी पदवीच्या तिसऱ्या वर्गाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडलीये.

शुभम पाटील असं या तरुणांचं नाव आहे. शुभम आडगाव परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केलीये.

आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठीही लिहिली होती. या चिठ्ठीत त्याने त्याच्यासोबत राहणाऱ्या ४ सहकारी मित्रांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटलेय. या प्रकरणी त्या चारही जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *