पहिलीत शिकणा-या चिमुकलीवर 6 जणांचे अत्याचार, 5 जण अल्पवयीन : 5 महिन्यांपासून प्रकार

कोंढव्यात मिठानगर येथे एका पहिलीत शिकणा-या ८ वर्षांच्या चिमुरडीवर ६ जण गेले ५ महिने अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका १८ वर्षांच्या मुलाला अटक केली असून, अन्य ५ जण अल्पवयीन आहेत़
याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले की, हा घृणास्पद प्रकार आॅगस्ट महिन्यापासून सुरू होता. ही मुलगी आणि मुले एकाच ठिकाणी राहण्यास असून, त्यातील दोन मुले १० वर्षांचे असून बाकीचे १२, ९ व ६ वर्षांचे आहेत. वस्तीमधील एकाजणीने या मुलीच्या आजीला तिची मुले छेड काढतात, असे सांगितले़. ही मुलगी वारंवार आजारी पडायची, गेल्या काही दिवसांपासून ती पोट दुखत असल्याची तक्रार करीत होती. त्यामुळे आजीने तिला एका डॉक्टरांकडे नेले.

डॉक्टरांना तपासणीत या मुलीच्या अंगावर काही रॅशेस दिसून आले, डॉक्टरांनी आपली शंका तिच्या आजीकडे बोलून दाखविली. त्यानंतर आजीने तिच्याकडे चौकशी केली असता तिने मारणार नाही ना, असे घाबरत घाबरत विचारले व त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. ही मुले तिला टेरेसवर घेऊन जात असत, तसेच एखाद्याच्या घरात कोणी नसेल तर त्याच्या घरात घेऊन जात असत. आजीने या मुलीच्या वडिलांना हा प्रकार सांगितला, त्यांनी १८ वर्षांच्या मुलाला जाब विचारता त्याने कबूल केले. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात 6 ते 12 या वयोगटातील पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं  असून निरीक्षणगृहात त्यांची रवानगी करण्यात आल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *