पीडित मुलीच्या कुटुंबाचा नागपूर विधान भवनावर ठिय्या

६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार होऊनही आरोपीवर कारवाई होत नाहीये, ही तक्रार घेऊन पीडित मुलीचं कुटुंब नागपूर विधान भवनावर आलं. मात्र विधान भवनात जाण्यासाठी आवश्यक प्रवेश पत्र नसल्याने त्यांना बाहेरच अडवण्यात आलं.

त्यानंतर त्यांनी विधान भवनाबाहेरच ठिय्या मांडला. औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबादमध्ये घराशेजारीच राहणाऱ्या चिमुकलीवर किरण खंडाईत या नराधमाने २८ जूनला अत्याचार केला. तपास करायला पोलिसांना २ महिने लागले.

एवढंच नाही तर तपास करताना पोलिसांनी अनेक गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केल्याने आरोपीला २० दिवसात जामीन मिळाला. याची दाद मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी हे कुटुंब नागपुरात आलं. मात्र त्यांना बाहेरच अडवण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *