लग्नास नकार देताच फेक फेसबुक प्रोफाइल बनवून अश्लील फोटो व्हायरल

क्लिनिकमध्ये एका तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेणार, तोच मुलाच्या श्रीमंतीचे बिंग फुटले. त्याने खोटी माहिती दिल्याचे समजातच तिने लग्नास नकार दिला. याच रागात तरुणाने तिचे अश्लील फोटो बनावट फेसबुक अकाउंटवरून व्हायरल केल्याचे रविवारी उघडकीस आले. तरुणीच्या तक्रारीवरून एमआरएमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
एमआरए मार्ग परिसरातील एका क्लिनिकमध्ये २८ वर्षीय तरुणी नोकरी करते. याच क्लिनिकमध्ये नितीन वर्मासोबत तिची ओळख झाली. वर्माने वडिलांचा डायमंडचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर तो खोटे बोलत असून बेरोजगार असल्याचे समजताच, तिने लग्नास नकार दिला. याच रागात त्याच्याकडील तिच्या फेसबुक पासवर्डच्या आधारे त्याने तिचे नवे फेसबुक प्रोफाइल बनवून तिचे अश्लील फोटो व्हायरल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *