सोलापूर येथील विजापूर रस्त्यावरील हत्तूर गावातील भिटे वस्ती येथील विहिरीमध्ये माय-लेकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज (सोमवारी) दुपारी उघडकीस आली.
करिना रियाज शेख (वय २४) आणि आबुजैद रियाज शेख (वय ४ महिने, रा. भिटे वस्ती, हत्तूर) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. करिना आणि रियाज शेख यांचा सुमारे दोन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. लग्नानंतर त्यांना मुलगा झाला असून पती रियाज हा मजुरीचे काम करतो.
सोमवारी दुपारी भिटे वस्ती येथील विहिरीमध्ये करिना आणि मुलगा आबुजैद या दोघांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला. याची माहिती विजापूर नाका पोलिसांना मिळताच त्यांनी दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
