झवेरी बाजारात सीपी चाळ इमारतीचा भाग कोसळला, दोघांचा मृत्यू

मुंबईतील झवेरी बाजारमध्ये सीपी चाळ इमारतीचा मोठा भाग शुक्रवारी कोसळला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

इमारतीच्या दुरूस्तीचं काम सुरू असतानाच इमारतीच्या मागील बाजूचा भाग कोसळला.

या दुर्घटनेतून ६ ते ७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं होतं. तर, काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

रात्री उशीरा दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारासची दुर्घटना घडली होती.

याठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानांचं अद्यापही घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *