अश्लिल व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनींशी चाळे

बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाने माणुसकीला आणि ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासणारे कृत्य केले. ढोरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दिगंबर शिंदे हा विद्यार्थिनींना अश्लिल व्हिडिओ दाखवून त्यांच्याशी चाळे करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिंदेला अटक केली आहे.

वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दिगंबर शिंदे हा दुपारच्या वेळेत काही मुलींना वर्गातच थांबवून ठेवायचा. त्यांना मोबाइलमधील अश्लिल व्हिडिओ दाखवून त्यांच्याशी अश्लिल चाळे करायचा. हा प्रकार एका विद्यार्थिनीने पालकांना सांगितला. या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर वडवणी पोलिसांनी रविवारी शिक्षकाला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *