नाशिकमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

नाशिकच्या नांदगाव शहरातील मल्हारवाडी, गांधीनगर, आनंदनगर, आंबेडकरनगर आणि रेल्वे गेट परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यांने चांगलीच दहशत निर्माण केलीय.

कुत्र्याने चावा घेतल्याने दहाच्या वर नागरिक गंभीर जखमी झालेत. जखमीमध्ये महिला आणि लहान बालकांचाही समावेश आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांना नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या कुत्र्याच्या दहशतीमुळे लोकं घराबाहेर निघण्यासही घाबरताहेत. त्यामुळे पालिकेने तातडीने पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करताहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *