मोटरमनच्या प्रसंगावधानाने हार्बर मार्गावरील मोठा अपघात टळला

आज सकाळी मुंबईतल्या हार्बर मार्गावर एक मोठा अपघात होता टळला.

सकाळी साडेसातची घटना

सकाळी 7.30 च्या आसपास हार्बर मार्गावरील मस्जिद स्थानकाजवळ अप दिशेला रेल्वे रुळावर तीन लोखंडी रॉड असल्याचं समोर आलं.

मोटारमनचं प्रसंगावधान

मोटरमन अनुराग शुक्ला यांना हे रॉड दिसल्यावर प्रसंगावधान दाखवून त्यांनी लोकल वेळीच थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला.आर पी एफ रेल्वे पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *