कोल्हापूरच्या जावयानं घेतलं अंबाबाईचं दर्शन

क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी लग्नानंतर कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं.

सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या घाटगे घराण्यातली आहे. लग्नानंतर नवपरिणीत दाम्पत्य प्रथमच कोल्हापुरात दाखल झालंय. यावेळी त्यांनी मंदिरात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं.

झहिर आणि सागरिकाच्या लग्नानंतर लवकरच हे जोडपं कोल्हापुरात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती… परंतु, झहीर आणि सागरिका कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कोल्हापुरात दाखल झाले… आणि त्यांनी देवीचं दर्शन घेऊन आपल्या नव्या एकत्र आयुष्याला सुरुवात केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *